
#अनंत गावाडे ,देवगाव!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
राज्य सरकारने वनखात्याच्यावतीने भीमगड अभयारण्यातील गावांचे स्थलांतर करून सफारीसाठी परवानगी दिल्यास मोठ्याप्रमाणात पर्यटकांचा ओघ वाढेल , मानवी हस्तेपक्ष वाढेल. आणि पर्यावरणाला धोका, होण्याबरोबरच वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येईल .अशी भिती देगावचे सामाजिक व भाजपचे कार्यकर्ते अंनत गावडे यानी व्यक्त केली आहे.
ते म्हणाले की ,या भीमगड अभयारण्यात १३ खेड्यातील ३००० हजार हुन अधिक ग्रामस्थ अनेक दशकापासुन प्रतिकुल परिस्थितीत राहत आहेत. हीच गावे मुलभूत सुविधापासुन वंचित आहेत.अशा गावाना सरकारला स्थलातरीत करण्याची घाई आहे. तर त्या गावाच्या सुविधा पुरविण्यास परवानगी देत नाही. दुसरीकडे गावांच्या मालकी जमिनीला वैद्यतोडीला मात्र खुले आम परवानगी दिले जात आहे.
त्यातच आता सफारी साठी परवानगी दिल्यास पर्यावरण प्रेमीनी कडाडुन विरोध दर्शविला आहे. तसेच आम्ही स्थानिकानी विरोध दर्शविला आहे.
जर सफारीसाठी परवानगी दिल्यास स्थानिकासह पर्यावरण प्रेमीनी सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवत तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.
तेव्हा सरकारने भीमगड अभयारण्यातील कुंटूबाचे स्थलातरीत करण्यापेक्षा विकास करावा .स्थानिकाना रोजगार द्यावा.मुलभूत गरजा पुरवाव्या अशी मागणी केली आहे.