
# दोघे गंभीर जखमी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
दोड्डहोसुर ( ता. खानापूर ) गावचे सुपूत्र व खानापूर आर्बन बॅकेचे माजी संचालक शिवाजी चुड्डापा पाटील याच्या कारला शनिवारी दि १५ रोजी रात्री ९ च्या दरम्यान खानापूर पारिश्वाड मार्गावरील दोड्डहोसुर गावापासुन जवळ असलेल्या यडोगा क्राॅसवर आपघात झाला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की माजी संचालक शिवाजी पाटील याची मुलगी बेंगळुरहुन बेळगावला आली होती. तिला आणण्यासाठी कारगाडी क्रमांक के ए.२२ एम डी.२३८७ वाहन घेऊण गेले होेते. बेळगावहुन गावाकडे येताना खानापूर पारिश्वाड मार्गावरील यडोगा क्राॅसवर कारगाडीचा टायर फुटून नियंत्रण सुटल्याने कारगाडी झाडाला धडकली. व कारगाडीने दोन पलट्या घेतल्या. याच वेळी त्याचगावचे युवक लक्ष्मी यात्रेला जात होते.
त्यानी हा आपघात प्रत्यक्षात पाहिला.लागलीच कार मधील शिवाजी पाटील व त्याच्या मुलीला कारमधुन बाहेर काढले.
लागलीच खानापूर पोलिसाना घटनेची माहिती दिली.उपचारासाठी बेळगाव येथील विजया हाॅस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.
शिवाजी पाटील यांच्या डोळ्याजवळ गंभीर जखम झाली आहे.तर मानेला ही मार लागला आहे. तर मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच माजी आमदार अरविंद पाटील यानी हाॅस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली.
त्याच्यावर उपचार सुरू आहेत.