
# खानापूर लोंढा रामनगर बससेवा गायब!
# महिलानी केली बसची मागणी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सध्या खानापूर तालुक्यात अनेक गावच्या लक्ष्मी यांत्राना प्रारंभ झाला आहे.
तालुक्यातील जास्त लोकवस्तीचे गाव म्हणजे नंदगड गाव तसेच सन्नहोसुर ,भंडरगाळी त्याचबरोबर रामगुरवाडी आदी गावच्या यात्रा गेल्या काही दिवसापासुन सुरू आहेत.
त्यामुळे खानापूर तालुक्यातील अनेक गावच्या बससेवाचा बोजवारा उडाला आहे.
सोमवारी दि .१७ रोजी खानापूर लोंढा रामनगर ही बससेवा दुपारपासुन बंदच होती.
जांबोटी क्राॅसवरील खानापूर मुख्य बसस्थानकावर लोंढा,रामनगर गावचे प्रवाशी मोठ्या संख्येने गर्दी करून होती.खानापूर लोढा रामनगर बस काही केल्यास सोडण्यास डेपो मॅनेजर तयार नाहीत .बसस्थानकावर महिलानी एकच आवाज उठविला सर्वानीच खानापूर लोंढा खानापूर बसची मागणी करताच अखेर उशीरा बस सोडण्यात आली.
त्यामुळे महिलावर्गानी समाधान व्यक्त केले.
खानापूर तालुक्यातील बससेवेचा बोजवारा कधी थांबणार अशी प्रतिक्रिया महिलानी व्यक्त केल्या.