
#ओटी भरण्यास महिलाची गर्दी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
नंदगड ( ता.खानापूर ) गावची ग्राम देवता लक्ष्मी देवीच्या यात्रेला प्रारंभ झाला असुन बुधवारी दि.१९ रोजी श्रीमहालक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकानी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
बुधवारी खानापूर तालुक्यास बेळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील भाविकानी गर्दी केली होती.व श्रीमहालक्ष्मी देवीचे घेतले.
यावेळी भाविकासह महिलाना ओट्या भरल्या. सकाळपासुन रात्री उशीरापर्यत दर्शनासाठी रीघ लावली होती.
बालगोपाळानी विविध मनोरंजनाच्या खेळात सहभागी होऊण यात्रे लाभ घेतला.
आज बुधवार असल्याने सकाळपासुन मोठ्यासंख्येने गावातील नागरीकांनी स्नेह भोजनाचा बेत आखला होता.त्यामुळे भाविक मोठ्यासंख्येने दाखल झाले होते.
यात्रेसाठी भाविकांची सोय व्हावी. यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.तसेच नंदगड सी.पी.आय.सी एस पाटील यानी चोख बंदोबस्त ठेवला होता.