
#मराठी भाषेचा गंध नसलेले अधिकारी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा बहुभाषीक तालुका त्यातच ८० टक्के मराठी भाषिक व केवळ २० टक्के कन्नड भाषिक असलेल्या तालुक्याला मराठी भाषेचा गंध नसलेल्या नुतन बीईओ पी रामाप्पा यानी गुरूवारी दि २० रोजी खानापूर तालुका बीईओ पदाचा पदभार स्विकारला.
गेल्या डिसेंबरच्या ३१ तारखेला बीईओ राजश्री कुडची या सेवानिवृत्त झाल्या. जानेवारी २०२५ पासुन नुतन बीईओ च्या प्रतिक्षेत असलेल्या खानापूर तालुक्याला मराठी भाषेचे ज्ञान असलेल्या बीईओची गरज होती. मात्र याकडे लोक प्रतिनिधीचे दुर्लक्ष झाल्याने दावनगेरी येथील सरकारी प्री ग्रज्यूएट काॅलेजचे उपप्राचार्य पी रामाप्पा यानी खानापूर तालुका बीईओ पदाचा पदभार स्विकारला.
त्यानिमित्त गुरूवारी दि २० रोजी नुतन बीईओ पी रामाप्पा पदाभार स्विकारला.
यावेळी खानापूर तालुका बीईओ कार्यालयाच्यावतीने त्याचे स्वागत करण्यात आले.
यावेळी बीईओ कार्यालयाच्यावतीने नुतन बीईओ पी रामाप्पा याचे शाल,पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.
यावेळी क्रिडा अधिकारी सुरेखा मिरजी, सुप्रिडेंट बी आर वाघमारे, निळकंट कुंभार,यासीन नदाफ , महेश मासमर्डी ,शिक्षण संयोजिका भारती लोकापूरे, सी आर पी चिचडी,,एस एन कम्मार कर्मचारीवर्ग उपस्थित होता.