
#कर्नाटक राज्य प्राथ.शिक्षक संघटना खानापूर!
#कर्नाटक राज्य सरकारी नोकर संघटना खानापूर !
संदेश क्रांती न्यू्ज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याचे नुतन बीईओ पी रामाप्पा यानी गुरूवारी दि २० रोजी खानापूर तालुका बीईओ पदाचा पदभार स्विकारला.
गेल्या डिसेंबरच्या ३१ तारखेला बीईओ राजश्री कुडची या सेवानिवृत्त झाल्या.नंतर प्रभारी बी ई ओ म्हणून ए.आर.अंबगी जानेवारी २०२५ पासुन बीईओचा कार्यभार सांभाळाला. त्यानंतर गुरूवारी दि २० फेब्रुवारी रोजी नुतन बी ई ओ पी रामाप्पा यानी बीईओ पदाची सुत्रे हाती घेतली.
दावनगेरी येथील सरकारी प्री ग्रज्यूएट काॅलेजचे उपप्राचार्य पी रामाप्पा यानी खानापूर तालुका बीईओ पदाचा पदभार स्विकारला.
त्यानिमित्त शुक्रवारी दि २१ रोजी नुतन बीईओ पी रामाप्पा पदाभार स्विकारल्यानंतर कर्नाटक राज्य खानापूर तालुका प्राथमिक शाळा संघटना व कर्नाटक राज्य सरकारी नोकर संघटना पदाधिकार्याच्या वतीने बीईओ कार्यालयात खानापूर तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सनदी व सरकारी नोकर संघटना तालुका अध्यक्ष बी एम यळ्ळूर याच्यानेतृत्वा खाली नुतन बीईओ पी रामाप्पा याचे शाल,पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुका शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व सरकारी नोकर संघटनेचे पदाधिकारी संचालक व शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.