
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
मुळचा कक्केरी (ता.खानापूर ) गावचा सध्या गवंडी कामानिमित्त मच्छे येथे वास्तव्यास असलेल्या गोविंद गणपती वड्डर ( वय.३४) याने कक्केरीत आपल्या नातेवाईकाच्या घरी गुरूवारी रात्री किटक नाशक घेऊन आत्महत्या केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गोविंद गणपती वड्डर राहणार कक्केरी जनता काॅलनी याने चेतन मायक्रोफायनान्स मधुन तसेच धर्मस्थळ संघाकडुन कर्ज घेतले होते.
गुरूवारी तो आपल्या कक्केरीतील बायकोच्या घरी वस्तीला होता.रात्री किटकनाशक विष घेऊन आत्महत्या केली.
सकाळी सासु लक्ष्मी यानी कचरा काढण्यासाठी खोली उघडली असता गोविंदने किटकनाशक विष घेऊन आत्महत्या केल्याचे आढळुन आले.
लागलीच नंदगड पोलिस स्थानकाला घटनेची माहिती देण्यात आली.
पोलिसानी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला .खानापूर सरकारी दवाखाण्यात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृत देह नांतेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
कर्नाटक राज्य शेतकरी असोसिएशनचे राज्यउपाध्यक्ष किशोर मिठारी म्हणाले की कर्जबाजारी झालेल्या युवकाने कर्जाला तसेच मानसिक त्रासाला कंटाळुन आत्महत्या केली.त्यामुळे कुटूंब वार्यावर पडले आहे.तेव्हा सरकारने कुटूंबाला न्याय द्यावा.अशी मागणी केली आहे.
मयत गोविंद वड्डर याच्या पश्चात पत्नी, मुलगा,मुलगी,आई,वडील भाऊ असा परिवार आहे.