
#ता.पं.च्यानिधीतुन १२ लाखाचा निधी मंजुर!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
सिंगीनकोप ( ता. खानापूर )येथील मराठी पूर्व प्राथमिक मराठी शाळेला विद्यार्थ्याना बसण्यासाठी वर्ग खोल्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती.
याची दखल घेऊन तालुका पंचायतीच्या निधीतुन १२ लाखाचा निधी एका वर्ग खोलीसाठी मंजुर करण्यात आला.
लागलीच आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते भुमीपुजन करून वर्गखोलीच्या कामाला सुरूवात करण्यात आली. व शाळा वर्ग खोलीच्या काम प्रगतीपथावर असुन
शुक्रवारी दि. २१ रोजी चौकट पुजन करण्यात आले.
यावेळी माजी ग्राम पंचायत सदस्य कृष्णा कुंभार, एस डी एम सी अध्यक्ष विश्वनाथ पाटील ,यशवंत डिचोलकर, चिंतामणी तिरकन्नावर,माधुरी कुंभार मुख्याध्यापक पी के सुतार, पी के कुंभार ,सौ.एल डी नलवडी,नामदेव कुंभार आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते चौकट पुजन करण्यात आले. या इमारतीच्या शाळा वर्गखोलीचे बाधकाम कंत्राटदार अमोल प्रकाश कुंभार यानी घेतले.सध्या शाळा वर्ग खोलीचे काम प्रगतीपथावर चालु आहे.
त्यामुळे सिंगीनकोप गावच्या शिक्षण प्रेमीतुन ,पालकातुन व नागरीकातुन समाधान पसरले आहे.