
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर जांबोटी क्राॅसवरील बसस्थानकात शुक्रवारी दि.२१ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास बसमध्ये चढताना महिलेच्या पर्समधील लाखो रूपये किमतीच्या सोन्याच्या दागीन्याची चोरी झाल्याची घटना घडली.
याबाबतची माहिती अशी की सन्नहोसुर (ता.खानापूर) गावची लक्ष्मी यात्रा असल्याने सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेल्या सविता ईराप्पा पाटील या यात्रा संपवुन शुक्रवारी सायंकाळी बसस्थानकात आल्या होत्या. यावेळी बेळगावला जाणार्या बसमध्ये चढताना कोणी अज्ञाताने गर्दीचा फायदा घेऊन पर्स कापली. व पर्स मधील सव्वा तोळ्याची चेन,सव्वा तोळ्याचे कानातील झुबे,आडीज तोळ्याचे गंठण, तसेच अंगठी व रोख तीन हजार रूपयासह ऐवज चोरट्यानी लांबविला.
लागलीच चोरी झाल्याची घटना समजताच कंडक्टरला माहिती दिली.लागलीच खानापूर पोलिस स्थानकात चोरीची माहिती देण्यात आली.लागलीच पोलिसानी घटनास्थळी धाव घेऊण तपास सुरू केला.परंतु ऐवज सापडला नाही.
त्यामुळे सदर महिलेचे लाखो रूपयाचे नुकसान झाले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
बसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेर्याची गरज!
खानापूर जांबोटी क्राॅसवरील मुख्यबसस्थानकात सीसीटीव्ही कॅमेर्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासुन होत आहे.
परतु केएसआरटी खात्याने याची दखल घेतली नाही.
त्यामुळे बसस्थानकात अनेक वेळा सोन्य दागीण्याची तसेच पैशाची चोरी होत आहे.
तेव्हा सीसीटीव्ही कॅमेर्याची पुन्हा एकदा गरज असल्याचे दिसुन आले.