
#दीपप्रज्वलन व फोटो पुजनाने सुरूवात!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
निलावडे ( ता.खानापूर ) येथे सालाबाद प्रमाणे यंदा ही रविवारी दि. २३ रोजी श्री पांडुरंग अखंड नाम सप्ताहाला प्रारंभ झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जोतिबा देसाई होते.
यावेळी दीपप्रज्वलन व फोटो पुजन बाळासाहेब शेलार नवनिर्वाचित संचालक अर्बन बँक, विनायक मुतगेकर अध्यक्ष तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटना खानापू, धनश्री सरदेसाई चेअरमन पी केपीएस जांबोटी,हभप विठोबा सावंत संचालक मार्केटींग सोसायटी नंदगड,वामन देसाई,दिनकर देसाई,प्रकाश कवळेकर,प्रसाद पाटील,शिवाजी देसाई,गणपती देसाई,रघुनाथ देसाई,रमेश देसाई, आदीच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष
,उपाध्यक्षा ,सदस्य, तसेच पीकेपीएस अध्यक्ष राजू धूरी,कृष्णा सावंत इतर संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी रमेश देसाई यानी प़्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी पुजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.
त्यानंतर सांप्रदायिक भजन ,सायंकाळी नामजप ,संगीत भजन,तर रात्री हभप प्रभूराज नानासाहेब वासकर महाराज पंढरपूर यांचे किर्तन ,त्यानंतर संगीतभजन कार्यक्रम पार पडला.
मंगळवारी महाप्रसादाचे आयोजन!
मंगळवारी दि २५ रोजी पहाटे काकड आरती ,संगीत भजन , सकाळी ११ वाजता सत्यनारायण पुजा होऊन महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे.