
#निवृत्त शिक्षक वाघू पाटील यांच्यावतीने!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील तिर्थकुंडे (कौलापूरवाड) येथील प्रसिध्द देवस्थान श्री रामलिंग देवस्थान मंदिरात दरवर्षी शिवरात्रीचा सन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
यंदा महाशिवारात्रीच्या उत्सवानिमित्त उद्या गुरूवारी दि.२७ रोजी सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यत कौलापूरवाड ( ता.खानापूर) येथील हभप ववैकुंठवासी धोंडू वाघू पाटील व कै.साऊबाई धोंडू पाटील यांच्या स्मरणार्थ निवृत्त शिक्षक वाघू धोंडू पाटील व सौ मालुबाई वाघू पाटील यांच्याकडुन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी महाप्रसादाला भाविकानी मोठ्यासंख्येने उपस्थित राहुन महाप्रसादाचा लाभ घ्यावा .असे आवाहन काग्रेस नेेते भैरू पाटील यानी केले आहे.