
अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर याच्याहस्ते #सत्कार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका ब्लाॅक काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी तसेच खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यानी खानापूर तालुक्याच्या जांबोटी भागातील मलप्रभा नदी काठावर असलेल्या स्वयंभू हनुमान मंदिराला खास महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त भेट दिली.
यावेळी स्वयंभू हनुमान मंदिर ट्रस्टचे चेअरमन लक्ष्मण कसर्लेकर यांच्याहस्ते अँड. ईश्वर घाडी,विनायक मुतगेकर याचा शाल,पुष्पहार व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना अँड ईश्वर घाडी म्हणाले, की हब्बनहट्टी स्वयंभू हनुमान देवस्थानची प्रसिध्दी केवळ तालुक्यातच नव्हेतर कर्नाटक,महाराष्ट्र व गोवा राज्यापर्यत आहे.त्यामुळे या देवस्थानची ख्याती वाढली आहे.
महाशिवरात्री निमित्त जवळ पास १० हजार भावकांनी हब्बनहट्टी स्वयंभू हनुमान मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली आहे .हेच या देवस्थानचे मोठेपण आहे. असे विचार व्यक्त केले.
यावेळी आभार मुख्याध्यापक सुनिल चिगुळकर यानी मानले.