
#रस्त्यावर झुडपांचे साम्राज्य!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात रस्त्यावरच झुडपांचे साम्राज्य पसरल्याने नागरीकाना ,वाहनाना येजा करताना खूप त्रास सहन करावा लागत आहे.
नगरपंचायतीने स्वच्छता कामगाराकडुन अथवा जेसीपीच्या सहाय्याने झुडपांचा बंदोबस्त करावा. या झाडा झुडपामुळे साप विषारी किटक राहत असल्याने नागरीकांच्या जीवास धोका संभवतो.रात्री अपरात्री नागरीकाना येजा करताना झुडपांची भिती वाटते.
नगरपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी वर्षातुन एकदा येत नाही.
विद्यानगरात रस्ता,गटारीच्या समस्या गेल्या अनेक वर्षापासुन आहेत. रस्त्याची स्वच्छता करण्यासाठी स्वच्छता कामगार वर्षातुन एकदा ही येत नाहीत. त्यामुळे विद्यानगरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे.
मात्र विद्यानगरातील नागरीक प्रामाणिकपणे दरवर्षी घर पट्टी,नळपाणी बील, व इतर टँक्स वेळेत भरतात. तर विकासाकडे दुर्लक्ष का करतात.
तेव्हा चीफ आँफिसर संतोष कुरबेट यानी विद्यानगरातील समस्याकेड लक्ष देऊन समस्या सोडवावी अशी मागणी केली आहे.