
#मृणाल हेब्बाळकर,आम.विठ्ठलराव हलगेकर,माजी आम.अरविंद पाटील,बीईओ पी.रामाप्पा,बीआरपी ए आर अंबगी यांची उपस्थिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
कालमणी ( ता.खानापूर ) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाली.यानिमित्त अमृत महोत्सव सोहळा नुकताच पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल कालमनकर (अध्यक्ष श्रीसिध्देश्वर फाऊंडेशन) होते.
प्रमुख पाहुणे म्हणून मृणाल हेब्बाळकर,आम.विठ्ठलराव हलगेकर,माजी आम.अरविंद पाटील, प्रकाश पाटील,बीईओ पी.रामाप्पा,बीआरपी ए आर अंबगी , बी एम यळ्ळळूर आदी मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन होऊन कार्यक्रमाची सुरूवात झाली.
उपस्थितांचे स्वागत शिवाजी सावंत,मिलींद नाईक,कृष्णा भरणकर आदीच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
यावेळी श्री सिध्देश्वर फाऊंडेशन माजी विद्यार्थी संघटनेने शाळेला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन केले हे कार्य कौतुकास्पद आहे.असे प्रतिपादन आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी बोलताना व्यक्त केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषने पार पडली.
कार्यक्रमाला विविध शाळांचे मुख्याध्यापक ,केंद्रप्रमुख,शिक्षकवर्ग,शिक्षक संघटना ,शिक्षक सोसायटीचे पदाधिकारी,आजी माजी विद्यार्थीवर्ग,एसडीएमसी सदस्य ,गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सीआरपी विठोबा दळवी,व्यंकट नाईक,सत्यदेव नाईक,तानाजी बाळजी आदीनी केले. तर आभार सोमाजी भरणकर, हरीश्चंद्र नाईक, सिध्दाप्पा भरणकर,सिध्दाप्पा मादार आदीनी मानले.