
#नगरसेवक प्रकाश बैलुरकर,प्रेमानंद नाईक यानी केली पाहणी !
#विद्यानगरातील नागरीकातुन समाधान!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात रस्त्याच्या दोन्ही बाजुला झाडाजुडपाच्या दुतर्फा वाढल्या त्याचा त्रास नागरीकानी होत होता.
याबाबत संदेश क्रांती न्यूज मधील बातमीची दखल नगरपंचायतीने घेतली. लागलीच नगराध्यक्षा सौ.मिनाक्षी प्रकाश बैलुरकर यानी रस्ता स्वच्छता करण्यासाठी चीफ आँफिसर संतोष कुरबेट याना माहिती देऊन गुरूवारी दि.६ रोजी नगरसेवक प्रकाश बैलुरकर व प्रेमानंद नाईक यानी सकाळी येऊन पाहणी केली. व स्वच्छता कामगाराकडुन विद्यानगरातील रस्ता, गटारीची स्वच्छता केली.
त्यामुळे विद्यानगरातील नागरीकांतुन समाधान पसरले आहे.