
#जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेत लांब उडी प्रथम क्रमांक!
#राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
नागुर्डावाडा ( ता. खानापूर ) येथील प्राथमिक मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ए.डी.चोपडे यानी निवृत्तीच्या उंबरड्यावर असताना बेळगाव जिल्हा सरकारी नोकरवर्गाच्यावतीने घेण्यात असलेल्या जिल्हा स्तरीय क्रिडास्पर्धेत लांब उडी मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. आता त्यांची निवड राज्यस्तरीय क्रिडास्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ऐवढेच नव्हेतर इयत्ता पहिली ते पाचवी पर्यतच्या वर्गासाठी गेल्या दोन ते तीन वर्षात एक ही शिक्षक नसताना स्वता एका शिक्षिकिने पाच वर्ग व मुख्याध्यापिकेची जबाबदारी पार पडली.
आँक्टोबरच्या व में च्या सुट्टीत सुट्टी न घेता सुट्टीत सुध्दा वर्ग घेतले अशा हाडाच्या शिक्षिका सौ ए.डी चोपडे यानी क्रिडा स्पर्धेत यश संपादन केले. त्यामुळे त्याचे खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळा शिक्षकाकडुन अभिनंदन होत आहे.तसेच तालुक्यातुन अभिनंदन होत आहे.