
#परीक्षा काळात विद्यार्थ्याना त्रास होणार नाही यांची दक्षता घ्या!
#रंगपंचमी दुपारी १२ वाजेपर्यतच!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरासह तालुक्यात होळी,रंगपंचमीचा सन शांतते साजरा करा. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व जाती धर्माच्या नागरीकांनी पोलिसाना सहकार्य करावे. असे आवाहन खानापूरचे पोलिस निरीक्षक लालसाब गवंडी यानी सोमवारी दि.१० रोजी खानापूर पोलिस स्थानकात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बोलताना केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की,होळी आणताना सावधगीरी बाळगावी.होळी उभारताना जबाबदारीने होळी उभारावी. नुकताच बारावीच्या तसेच प्राथमिक ,हायस्कूलच्या वार्षिक परीक्षा सुरू आहेत. रंगोत्सव काळात परिक्षेला जाणार्या विद्यार्थ्याना त्रास होणार नाही .याची दक्षता घ्यावी. दुपारी १२ वाजेपर्यतच रंगपंचमी खेळावी. आदी सुचना केल्या.
यावेळी बोलताना नगरसेवक प्रकाश बैलुरकर म्हणाले की रंगपंचमी बुधवारी दि.१९ रोजी होणार आहे.तर निंगापूर गल्लीतील चव्हाटा देवस्थानची यात्रा सालाबादप्रमाणे दुपारी २ ते रात्री १० पर्यत होणार आहे. यावेळी भाविकानी शांततेत दर्शन घ्यावे.असे आवाहन केले.
यावेळी बैठकीला नगराध्यक्षा सौ मिनाक्षी बैलुरकर,प्रकाश देशपांडे,रवी काडगी,चंबान्ना होसमनी,एन सी तलवार,महांतेश राऊत , मल्लेशी पोळ,नगरसेवक लक्ष्मण मादार,नारायण ओगले,विनायक कलाल, भाजप युवा नेता पंडित ओगले.राजू खातेदार आदी उपस्थित होते.
उपनिरीक्षक श्री बिरादार यानी आभार मानले.