
#पाटबंधाराखात्याचे अधिकारी जबाबदार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील निलावडे ग्राम पंचायत हद्दीतील मलप्रभा नदीवरील आंबोळी ,मळव बंधारातील पाण्यावर निलावडे ग्राम पंचायत हद्दीतील गावाना पाण्याचा पुरवठा होतो.यासाठी सबंधीत पाटबंधारे खात्याच्या अधिकार्याना निलावडे ग्राम पंचायतीचे सदस्य व तालुका ग्राम पंचायत सदस्य समितीचे चेअरमन विनायक मुतगेकर यानी गेल्या दोन महिण्यापूर्वीच बंधार्यात पाण्याचा साठा करा .अशी सुचना केली होती.याकडे संबधित पाटबंधारर्याचेे अधिकारी श्री मराठे यानी दुर्लक्ष केले. तसेच लोकप्रतिनिधीनी दुर्लक्ष केले.त्यामुळे आज आंबोळी व मळव बंधार्यातुन पाण्याचा साठी नाही मार्च ते जुन या काळात निलावडे ग्राम पंचायत हद्दीतील गावाना पाण्याची समस्या भेडसावणार आहे.
पाटबंधार्याच्या अधिकार्यानी टॅकरव्दारे पाणी पुरवठा करावा. ! विनायक मुतगेकर.
सध्या निलावडे ग्राम पंचायत हद्दीतील गावाना पाण्याची समस्या भेडसावित आहे. पाटबंधार्याचे अधिकारी श्री मराठे यानी त्यावेळी दुर्लक्ष केले. त्याच्या चुकीमुळे पाटबंधारे करोडे झालेत.तेव्हा त्या अधिकार्यानी निलावडे ग्राम पंचायत हद्दीताल गावाना टॅकरने पाणी पुरवठा करावा. अशी सुचना केली.अन्यथा नागरीकांचा मोर्चा संबधित खात्याच्या कार्यालयावर काढुन निदर्षणे करण्याचा ईशारा दिला आहे.
सध्या कडक उन्हामुळे पाण्याची समस्या उदभवत आहे. तेव्हा निलावडे ग्राम पंचायत हद्दीतील गावाना टॅकरने पाण्याची व्यवस्था करावी .अशी मागणी होत आहे.