
#सरकारी नोकर क्रीडास्पर्धेतील थाळी फेक प्रथम! गोळा फेक व्दितीय !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
देवलती ( ता.खानापूर ) येथील उच्च प्राथमिक कन्नड शाळेच्या क्रिडा शिक्षिका श्रीमती मीरा शिवाजी पाटील यानी नुकताच बेळगाव येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय सरकारी कर्मचारी वर्गाच्या क्रिडा स्पर्धेत भाग घेऊन यश संपादन केले.
या स्पर्धेतील थाळी फेक मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला तर गोळा फेक मध्ये व्दितीय क्रमांक असे यश संपादन करून त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रिडाशिक्षिका श्रीमती मीरा शिवाजी पाटील याना बैलहोंगल तालुक्याच्या क्रिडा अधिकार्याच्याहस्ते पदक तसेच प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले.
त्यांच्या यशा बद्दल खानापूर तालुक्यातून तसेच शाळा शिक्षकातुन अभिनंदन होत आहे.
श्रीमती मीरा शिवाजी पाटील या क्रिडा शिक्षिका म्हणून अनेक वर्षे सेवा करतात.