
#,PMJJBY प्रधानमंत्री जीवन ज्योती भीमा योजना!
# PMSBY प्रधानमंत्री सुरक्षा भीमा योजना!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
बेळगाव जिल्हा प्रशासन व जिल्हा पंचायत बेळगांव तसेच जिल्हास्तरीय बॅक समिती याच्या सयुक्त विद्यामाने शनिवारी दि.१५ रोजी खानापूर नगरपंचायतीसह तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात एक दिवशीय जनसुरक्षा नोंदणी अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
# PMJJBY प्रधानमंत्री जीवन ज्योती भीमा योजनेसाठी पात्रता वयोगट १८ ते ५० वर्षे. शेवटची तारीख ३१ मे पर्यत , प्रीमियम रक्कम ४३६ रूपये.असुन फायदा कोणत्याही कारणास्तव ५० वर्षाच्या आत मृत्यू झाल्यास २ लाख विमा रक्कम वारसाना उपलब्ध होईल.
PMSBY प्रधानमंत्री सुरक्षा भीमा योजना वयोमर्यादा १८ ते ७० वर्षे . शेवटची तारीख ३१मे रोजी आँटोडेबीटव्दारे प्रीमीयम रक्कम २० रूपये. आपघात किंवा आपघात संरक्षण म्हणून एक अवयवाचे अपंगत्व ( हात ,पाय,डोळा) आल्यास १ लाख रूपये.तसेच दोन अवयवाचे अपंगत्व ( हात पाय,डोळा ) आल्यास २ लाख रूपये .तर मृत्यू झाल्यास २ लाख रूपये वारसास मिळले जातील.
तेव्हा सर्वानी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन तालुका पंचायतीचे एस एम अमणगी यानी पत्रकाराशी बोलताना सांगीतले.