
खानापूर प्रतिनिधी
हलगा ( ता.खानापूर ) येथील ग्राम पंचायतीचे अध्यक्ष महाबळेश्वर पाटील याच्यावर अनेक वेळा अविश्वासाचा ठराव करण्यात आला.शेवटी त्याला यश आले .व अखेर अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्यावर अविश्वासाचा ठराव मंजुर होऊन आता नविन अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित झाली असुन गुरूवारी दि.२० मार्च रोजी ग्राम पंचायतीच्या कार्यालयात अध्यक्षपदाची निवडणुक होणार आहे.
हलगा (ता खानापूर ) अध्यक्ष पदासाठी मागासवर्गीय ब गटासाठी राखीव असुन जिल्हाधिकार्याच्या आदेशानुसार निवडणुक पार पडणार आहे.
यावेळी निवडणुक अधिकारी म्हणून तालुका कृषी अधिकारी मंजुनाथ माविनकोप हे काम पाहणार आहेत.
यावेळी निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी नामनिर्देशन अर्ज भरणे,छाननी ,अर्ज मागे घेणे व वेळ पडल्यास मतदान प्रक्रिया अशा टप्प्यात निवडणुक पार पडणार आहे. लागलीच मत मोजणी नंतर निकाल ही जाहीर होणार आहे.
तेव्हा संपूर्ण खानापूर तालुक्याचे लक्ष हलगा ग्राम पंचायतीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे लागुन आहे.