
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
मराठी भाषेची जपणुक झाली पाहिजे. मराठी भाषा टिकवायची असेल तर मातृभाषेतुन शिक्षण घेणे गरजेचे आहे. हा उद्दात हेतू ठेवुन गोदगेरी ( ता.खानापूर ) येथे कै .शिवराम देसाई यानी सन १९१३ साली शाळेची सुरूवात झाली.आज याशाळेला ११२ वर्षे पूर्ण झाली. सन १९१३ साली देश प्रारंतत्र्यात असताना सुध्दा मातृभाषेतुन शिक्षणाची सोय केली. त्यांचे ऋृण फेडायचे असेलतर आज मातृभाषेतुन शिक्षण झाले पाहिजेत . हीच मराठी शाळा टिकवायची असेल तर सरकारच्या मदतीची वाट न पाहता माजी विद्यार्थ्यानी आर्थिक मदत करून मराठी शाळा टिकवकता आल्या पाहिजे.
शाळी ही अंतर्मुख करणारी असुन क्षणाक्षणाला समाजाच्या कल्याणासाठी शाळेची निर्मिती झाली पाहिजे असे प्रतिपादन अभिनेते प्रसाद पंडित यानी गोदगेरी (ता.खानापूर) मराठी शाळेच्या शतकोत्तर तपपूर्ती सोहळ्यात प्रमुख वक्ते या नात्याने बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी.जे.बेळगावकर होते.
व्यासपीठीवर आमदार विठ्ठलराव हलगेकर,माजी आमदार दिगंबर पाटील,पीटर डीसोझा,विजय पाटील ,कौस्तुब देसाई, अँड.ईश्वर घाडी, किरण गडकर रूपेश गुंदकल,नागेंद्र कुन्नूरकर, स्वागताध्यक्ष दिगंबर बेळगांवकर,सचिव गौतम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक शिवाजी जळगेकर यानी केले.पाहुण्याचा परिचय मुख्याध्यापक एन डी पाटील यानी करून दिला.
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी स्मृतिगंध या स्मरणिकीचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी पाहुण्याचा सत्कार ,शिक्षकांचा सत्कार,माजी विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली.
अध्यक्षिय भाषणात बी जे बेळगावकर यानी मराठी शाळा टिकविण्यासाठी सर्वानी प्रयत्न केले पाहिजे .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवाजी जळगे व मुख्याध्यापक एन डी पाटील यानी केले.