
#एकूण विद्यार्थी ३८८३ ! शुक्रवारी परीक्षेला प्रारंभ!
#पत्रकार परिषदेत बीईओनी दिली माहिती!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
सन २०२४-२५ सालच्या दहावीच्या परीक्षेसाठी खानापूर तालुक्यात फक्त ११ केंद्रे असुन तालुक्यात ३८८३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
मागील वेळी तालुक्यात १४ केद्रे होती .ती आता ११ केंद्रे झाली आहेत. खानापूर तालुक्यात दहावीच्या परीक्षेसाठी दरवर्षी विद्यार्थ्याची संख्या कमी होतआहे.
यावर्षी तालुक्यात रेग्यूलर विद्यार्थी ३६४३ असुन बहिस्थ विद्यार्थी २०४ तर रिपीटर ३३ व सीसीईआर ३ विद्यार्थी असे एकूण ३८८३ विद्यार्थी परिक्षा देणार आहेत.
परीक्षेसाठी एकूण वर्ग खोल्या १७४ असुन सुपरवाईझर २४० आहेत.प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.परीक्षेसाठी ४ डेप्यूडी सेंटर चीफ,११ कस्टुडियम , ११ मोबाईल आँफिसर ,१४ सिटींग स्काॅड ,९ फ्लाईग स्काॅड,७ रूट आँफिसर, ३ व्ही .व्ही टीम असुन नोडल अधिकारी म्हणून भारती लोकापूर या काम पाहणार आहेत. अशी माहिती खानापूर बीईओ पी रामाप्पा यानी मंगळवारी दि १८ रोजी बीईओ कार्यालयात बोलविलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बीआरपी ए.आर.अंबगी, नोडल अधिकरी भारती लोकापूर, मॅनेजर प्रकाश होसमनी, एस एन कम्मार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बीईओ पी रामाप्पा म्हणाले की प्रत्येक केंद्रावर विद्यार्थ्यासाठी बसची सोय होणार आहे. तसेच बंदोबस्तासाठी पोलिस व आरोग्य खात्याचे कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती दिली आहे.
#तालुक्यातील ११ दहावीची परीक्षा केंद्रे!
खानापूर शहरात ३ केंद्रे : मराठा मंडळ हायस्कूल, ताराराणी हायस्कूल, सर्वोदय इंग्लिश मिडीयम स्कूल. शांतिनिकेतन पब्लिक स्कूल ,जाबोटी,पारिश्वाड,इटगी,लोंढा,बिडी,मुगळीहाळ,नंदगड,अशी ११ केंद्रे आहेत.