
#अबलपासुन महिलांचाही सहभाग!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर शहरासह तालुक्यात बुधवारी रंगपंचमी जल्लोषात साजरी झाली.
खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात बुधवारी सकाळपासुनच रंगीबेरंगी रंगाची उधळण करत गल्लीत अबल पासुन महिलानीही रंगपंचमी सनाचा रंगाची उधळन करत आनंद लुटला.
सकाळपासुनच रंगोत्सवात युवा पिढी,अबाल,महिला आदीचा लक्षणीय सहभाग होता.
विद्यानगरात डीजे लावुन संगीताच्या तालावर रंगपंचमीचे आयोजन करण्यात आले होते.
खानापूर शहरातील लक्ष्मी मंदिर, निंगापूर गल्ली चव्हाटा देवस्थान ,स्टेशन रोड,बाजारपेठ, केंचापूर गल्ली, बर्याच ठिकाणी रंगपंचमी डीजेच्या तालावर जल्लोषात आणि शांततेत रंगपंचमी साजरी करण्यात आली.
उद्या खानापूरात चव्हाटा देवस्थान यात्रा!
सालाबाद प्रमाणे यंदाही खानापूर शहरातील निंगापूर गल्लीतील चव्हाटा देवस्थानाचा वार्षिक यात्रोत्सव उद्या गुरूवारी दि.२० रोजी दुपारी ३ वाजता विधीवत पुजा होऊण यात्रेला प्रारंभ होणार आहे.
होळीच्या सनातील चव्हाटा देवस्थान यात्रेला हजारो भाविक उपस्थित असतात.
यावेळी रात्री ११ पर्यत भाविक देवाचे दर्शन घेण्यासाठी व नवस फेडण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावतात.
यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.