
#खानापूर तालुक्यात एकूण विद्यार्थी ३८८३ !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
सन २०२४-२५ सालची दहावीची परीक्षा उद्या शुक्रवारी दि.२१ पासुन प्रारंभ होत आहे. यासाठी खानापूर तालुक्यातील ११ केंद्रावर जय्यत तयारी करण्यात आली असुन तालुक्यात ३८८३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
यावर्षी तालुक्यात रेग्यूलर विद्यार्थी ३६४३ असुन बहिस्थ विद्यार्थी २०४ तर रिपीटर ३३ व सीसीईआर ३ विद्यार्थी असे एकूण ३८८३ विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी एकूण वर्ग खोल्या १७४ असुन सुपरवाईझर २४० आहेत.प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
परीक्षेसाठी ४ डेप्यूडी सेंटर चीफ,११ कस्टुडियम , ११ मोबाईल आँफिसर ,१४ सिटींग स्काॅड ,९ फ्लाईग स्काॅड,७ रूट आँफिसर, ३ व्ही .व्ही टीम असुन नोडल अधिकारी म्हणून भारती लोकापूर या काम पाहणार आहेत.
प्रत्येक केंद्रावर विद्यार्थ्यासाठी बसची सोय होणार आहे. तसेच बंदोबस्तासाठी पोलिस व आरोग्य खात्याचे कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक !
शुक्रवार दि.२१़ मार्च रोजी प्रथम भाषेचा पेपर, दि.२४ मार्च रोजी गणित पेपर, दि २६ मार्च रोजी द्वितीय भाषा तर दि.२९मार्च रोजी समाज विज्ञान पेपर, तर दि.२ एप्रिल रोजी विज्ञान पेपर घेण्यात येणार असून, शेवटचा पेपर दि.४ एप्रिल रोजी तृतीय भाषेचा पेपर घेण्यात येणार आहे.