
#निवडणुक अधिकारी कृषी अधिकारी मंजुनाथ मनकावी!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
हलगा ( ता.खानापूर ) येथील नुतन ग्राम पंचायत अध्यक्षपदी सुनील पाटील याची बिनविरोध निवड गुरूवारी दि.२० रोजी करण्यात आली.
यावेळी निवडणुक अधिकारी म्हणून कृषी खात्याचे अधिकारी मंजुनाथ माविनकोप होते.
यापूर्वीचे ग्राम पंचायत अध्यक्ष महाबळेश्वर पाटील यांच्यावर अविश्वासाचा ठराव झाल्यानंतर हलगा ग्राम पंचायतीवर अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण खानापूर तालुक्याचे लक्ष लागुन होते.
आज गुरूवारी दि.२० रोजी अध्यक्ष पदाची निवडणुक घेण्यात आली. सकाळी ११ वाजता निवडणुक प्रक्रियेला सुरूवात झाली .
यावेळी यावेळी सदस्य सुनील पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला आहे.अर्ज भरणा झाल्यानंतर अर्जाची छाननी करण्यात आली. सदस्य सुनिल पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने सुनील पाटील यांची बीनविरोध निवड झाल्याची निवडणुक अधिकारी मंजुनाथ मनकावी यानी जाहिर केले.
निकाल जाहिर होताच ग्राम पंचायत सदस्य रणजित पाटील,पांडुरंग पाटील,मंदा पठाण ,स्वाती पाटील, इंदिरा मेदार,नाझिया सनदी आदी उपस्थित होते. तर तीन सदस्य गैरहजर होते.यात अविश्वाचा ठराव ज्यांच्यावर घातला होता.ते महाबळेश्वर पाटील सुध्दा गैर हजर होते.
अध्यक्षपदी सुनिल पाटील यांची बिनविरोध निवड होताच सदस्यानी गुलाल उधळुन विजयोत्सव साजरा केला.
यावेळी नुतन ग्राम पंचायत सदस्य सुनिल पाटील म्हणाले की.गेल्या काही महिण्यापासुन रखडलेली कामी मार्गी लावणार आहे.विकास कामाना प्राधान्य देणार आहे.तसेच नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी मी सतत प्रयत्न करणार आहे असे सांगीतले.