
#मांडल्या खानापूर तालुक्याच्या समस्या!
#कोंगळा,मागीनहाळ,अमगाव ब्रीजची केली मागणी, जंगली प्राण्यांचा बदोबस्त, बंदुकाचा परवाना आदी समस्यावर चर्चा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील)
खानापूर तालुक्याच्या अति जंगल भागातील कोगळा,आमगांव,मागीनहाळ गावचे ब्रीज, जंगली प्राण्यांचा बंदोबस्त,वर्षभरा पासुन बंदूकाचा परवाना देण्यात आला नाही.तसेच अनेक गावाना पक्के रस्ते पाणीपुरवठ्याच्या पाईप लाईन व वीज वाहिण्यांच्या कामासाठी वनखात्याने विरोध न करता विकास कामाना सहकार्य करावे.अशी मागणी खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी व भूलवाद कमिटीचे सदस्य विनायक मुतगेकर यानी राज्याचे वनमंत्री ईश्वर खांड़रे याची भेट घेऊण केली.
यावेळी समस्या मांडताना अँड घाडी म्हणाले की,तालुक्याच्या मान, कुणकुंबी,जांबोटी भागातील जनतेच्या विकासासाठी वनखात्याने विकास कामाच अडथळा आणू नये. याभागात ब्रीज, रस्ते ,नसल्याने बससेवा होत नाही.
तर पावसाळ्यात या गावाना बेटाचे स्वरूप आलेले असते. याशिवाय जंगली प्राण्याचे हल्ले ,त्यातच अतिवृष्टीमुळे जंगलातील गावाना मदत मिळत नाही. तेव्हा या समस्या सोडवा. अशी मागणी केली.
यावेळी वनमंत्री ईश्वर खांडरे यानी समस्या लक्षात घेऊन या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.