
#सन १९८६ ते २०२४ पर्यतच्या सर्व विद्यार्थ्याचा होणार सहभाग!
#प्रथम माजी विद्यार्थ्याकडुन हायस्कूलच्या इमारतीची दुरूस्ती,रंगरगोटी!
#माजी विद्यार्थ्याच्या बैठकीत विविध विषयावर चर्चा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
तोपिनकट्टी ( ता.खानापूर ) येथील श्री महालक्ष्मी हायस्कूलच्या सन १९८६ ते २०२४ पर्यतच्या सर्व माजी विद्यार्थ्याचा स्नेहसोहळा मे महिण्याच्या पहिल्या आठवड्यात साजर करण्यात येणार आहे.
यानिमित्त पूर्वनियोजनासाठी रविवारी दि १२ रोजी तोपिनकट्टी येथील श्रीमहालक्ष्मी हायस्कूलमध्ये बैठक पार पाडली.
यावेळी माजी विद्यार्थी अशोक गुणापाचे यानी प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश स्पष्ट केला.
माजी विद्यार्थ्यानी बैठकीत बोलताना सांगीतले की केवळ कोणत्या एका सालच्या १० वीच्या विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा नसुन हायस्कूल स्थापना झाल्यापासुन सन १९८६ साला च्या विद्यार्थ्या पासुन ते २०२४ पर्यतच्या माजी विद्यार्थ्याचा सहभाग राहणार आहे. यात ३५ इयत्ता १० वीच्या बॅचीसच्या विद्यार्थ्याचा सहभाग आहे.
स्नेहसोहळा तीन सत्रात होणार असुन पहिल्या दोन सत्रासाठी दोन वक्त्यांना आमंत्रीत करण्यात येणार आहे.
सकाळच्या सत्रात उदघाटन सोहळा, कै. संस्थापकांच्या पुतळ्याचे आनावरण,माजी आजी शिक्षकाचा सत्कार, इतर सत्कार व वक्त्यांचे भाषण आदी
दुसर्या सत्रात माजी् विद्यार्थ्याचे कार्यक्रम ,वक्त्यांचे भाषण व इतर कार्यक्रम तर तिसर्या सत्रात मनोरंजनाचा कार्यक्रम आदी विषयावर चर्चा करण्यात आली.
यावेळी श्रीमहालक्ष्मी हायस्कूलचे सुरूवातीचे शिक्षक सुरेश भातकांडे उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले हायस्कूलची उभारणी करताना मला शिक्षक म्हणून सेवा करण्याची संधी १९८६ साली मिळाली.त्याकाळात हायस्कूल इमारत नसताना मंदिरात, लोहार शाळेच्या माडीवर असे वर्ग घेऊन हे हायस्कूल चालविले आहे.आज या हायस्कूलला स्वतंत्र इमारत आहे. व माजी विद्यार्थ्याच्या वतीने स्नेहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तेव्हा माजी विद्यार्थ्यानी हा स्नेहसोहळा मोठा उत्साहाने पार पाडाल असे मत व्यक्त केले.
हायस्कूलचे जेष्ठ शिक्षक प्रकाश गोरे यानी ही माजी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
आभार क्रिडा शिक्षक रामचंद्र होसुरकर यानी मानले.
बैठकीला माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.