
#अँड.ईश्वर घाडींचे आवाहन!
खानापूर प्रतिनिधी
आज सोमवारी दि. १४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न संविधान सिल्पी यांच्या जयंतीनिमित्त खानापूर तालुक्यातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महिला युवक कार्यकर्त्यांनी ठीक सकाळी दहा वाजता आंबेडकर गार्डन येथे जमायचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि दिलेली राजघटना याचा पालन करणे गरजेचे आहे. काही लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलून देशामध्ये हाहाकार माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आणून पाठवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करण्यासाठी सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती ही काळाची गरज आहे.
मी हात जोडून विनंती करतो जे जे सच्चे कार्यकर्ते आहेत. त्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जमणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे काँग्रेसचे विचार, डॉ बाबासाहेब आंबेडकर च्या विचारधारेप्रमाणेच काँग्रेस पक्ष वाटचाल करत आहे. पण संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना आम्ही धडा देण्याचे गरज आहे. लोकांनी आजपर्यंत भारताची लोकशाही टिकून ठेवली असेल तर ते काँग्रेस पक्ष होय.
दिवंगत माजी पंतप्रधान भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, दि.राजीव गांधी यांनी तळागाळातील लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर च्या विचारधारेवरती त्यांना स्वातंत्र्याची आणि संविधानाची फळे चाखायची असेल त्यासाठी २० कलमी कार्यक्रम आयोजित करून गल्लीपासून ते वाड्यापर्यंत शाळा, कॉलेज, रेल्वे स्टेशन विमानतळ बँकाच विलीनीकरण, कुळ कायदा , शिक्षण, ११ पगड जाती १२ बलुतेदार यांना संविधान प्रमाणे त्यांना मनुष्य म्हणून जगणेचे बळ केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारा, लोकशाही आणि संविधान याचं कौतुक केलं जातं. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरनी मनुष्य जातीला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार दिला. म्हणुनच भारतामध्ये लोकशाही प्रबळ आहे. आंबेडकर यांचा विचार गल्लीपासून ते वाड्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आमच्या खानापूरच्या माजी आमदार, अखिल भारतीय काँग्रेसच्या प्रधान कार्यदर्शी डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचा विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचं महान कार्य केलेले आहे.
आपल्या नेत्या डॉ. अंजली ते निंबाळकर यांनी दिलेल्या आव्हानानुसार तमाम खानापूर तालुक्यातील समस्त काँग्रेस कार्यकर्त्यांना विनंती करत आहे की.. उद्या सकाळी ठीक १० वाजता बाबासाहेब आंबेडकर गार्डन पटांगणामध्ये सर्वांनी उपस्थित राहून या महान नेत्याला अभिवादन करावे .
असे आवाहन खानापूर तालुका काॅग्रेस पक्षाचे अध्यक्ष ॲड ईश्वर घाडी यानी केले आहे.