
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
मणतुर्गा ( ता.खानापूर ) येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक एम एम. देवकरी याना यंदाचा सन २०२४-२५ सालाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.
उद्या गुरूवार दि ५ सप्टेंबर रोजी बेळगांव येथील गांधीभवन कार्यालयात सकाळी होणार्या शिक्षक दिन कार्यालयात पाहुण्याच्याहस्ते सत्कार होणार आहे.
एम एस देवकरी हे मणतुर्गा ( ता.खानापूर ) गावचे सुपूत्र होय.त्यानी नोकरीची सुरूवात धोंडगड्डे (ता.हुक्केरी ) येथे ५ वर्षे सेवा केली.त्यानंतर नंदीहळ्ळी ( ता.बेळगाव ) येथे २ वर्षे सेवा केली.तिवोली (ता.खानापूर )येथे १२ वर्षे सेवा केली.त्याचबरोबर शेडेगाळी ( ता.खानापूर ) येथे ४ वर्षे सेवा केली .तर आपल्या जन्मगावी म्हणजे मणतुर्गा ( ता.खानापूर ) यागावी गेली ९ वर्षे सेवा बजावत आहेत.
या आधी एम एम देवकरी याना रोटरी क्लब आँफ बेळगाव याच्यावतीने जिल्हा आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यंदाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळल्याबद्दल मणतुर्गा गावासह खानापूर तालुक्यातुन एम एम देवकरी याचे अभिनंदन व कौतुक होत आहे.