
#शिवस्मारक सभागृहात मान्यवरांच्याहस्ते प्रकाशन सोहळा संपन्न!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर येथील शिवस्मारक चौकातील माजी आमदार कै व्ही.वाय.चव्हाण सभागृहात आयोजित “अक्षय सार्वमत ” या २०२४ सालच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन सोहळा रविवारी दि.२७ रोजी पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जांबोटी मल्टपर्पज सोसायटीचे संस्थापक व म ए समितीचे नेते अक्षय सार्वमत दिवाळी अंकाचे संपादक विलास बेळगांवकर होते.
प्रकाशन सोहळयाला निवृत्त मुख्याध्यापक एस जी शिंदे, सीमासत्याग्रही समितीचे नेते शंकर पाटील (निडगल) , आम आदमी तालुका अध्यक्ष भैरू पाटील, अनिल देसाई, पुणे येथील उद्योजक अनिल बीर्जे, प्रमोद कल्याणी,व इतर मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना अक्षय सार्वमत या दिवाळी अंकाचे संपादक विलास बेळगावकर म्हणाले की यंदा ३६ व्या वर्षी “अक्षय सार्वमत “या दिवाळी अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्याहस्ते होत आहे.याचा मला खूप आनंद झाला.
दिवाळी अंकाची स्थापना १९८९ साली करण्यात आली.आणि यंदा दिवाळी अंकाचे ३६ वर्ष आहे. या ” अक्षय सार्वमत ” दिवाळी अंकात ग्रामीण भागावर अधारीत कथा ,कविता,लघू कथा यांचा समावेश आहे .महाराष्ट्रातील कथाकार,कवी असुन सुंदर असे लेखन केलेले आहे.वाचकाना अक्षय सार्वमत दिवाळी अंक नक्कीच आवडेल याचा आम्हाला विश्वास आहे.
प्रारंभी आम आदमीचे तालुका अध्यक्ष भैरू पाटील यानी प्रास्ताविक करून उपस्थिताचे स्वागत केले.