
#अन्यथा सार्वजनिक खात्याच्या कार्यालयास टाळे टोकू!
#खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यांचा इशारा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर शहरातील फिश मार्केट ते करंबळ क्राॅस पर्यतच्या रस्तावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहनधारकाना वाहने चालविणे धोक्याचे बनले आहे.
सातत्याने दुरूस्तीची मागणी करून ही संबधीत सार्वजनिक बांधकाम खाते दुर्लक्ष करत आहे.
तेव्हा येत्या गुरूवार पर्यत या रस्त्याची दुरूस्ती केली नाही तर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाला टाळे टोकण्याचा इशारा खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यानी दिला आहे.
नुकताच झालेल्या पावसामुळे खानापूर फिश मार्केट ते करंबळ क्राॅस पर्यतच्या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. वाहनधारकाना वाहने चालविणे धोक्याचे झाले आहे. तर केंद्र सरकारकडुन रस्त्याच्या विकासासाठी निधी मंजुर झाला आहे. मात्र यारस्त्याच्या विकास कामाला केव्हा सुरूवात होईल याची शास्वती नाही. तेव्हा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्याकडे रस्त्याची दुरूस्ती करावी .अशी मागणी करून देखील याकडे अधिकार्यानी दुर्लक्ष केले आहे.
आता दिवाळी सनाला सुरूवात होत आहे. परराज्यातुन चाकरमनी मोठ्याप्रमाणात आपल्या गावी येतात.तेव्हा गुंजी, नंदगड, बिडी,लोंढा भागातील नागरीक या रस्त्यावरून येजा करतात. तेव्हा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे आपघाताना आमंत्रण दिले जात आहे.यासाठी खानापूर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यानी येत्या गुरूवारी दि.३१ आँक्टोबर रस्त्याची डागडुजी केली नाही. तर संबंधित खानापूर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाला टाळे टोकण्याचा ईशारा खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यानी दिला आहे.