
#खानापूर काॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यानी घेतली दखल!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील)
खानापूर तालुक्यातील पणजी बेळगांव महामार्गाला लागुन असलेेल्या शिंदोळी,होनकल,आदी गावच्या विद्यार्थ्याना गावापर्यत बससेवा नसल्याने पणजी बेळगाव महामार्गापर्यत चालत यावे लागते.
मात्र महामार्गावरील क्राॅसवर रामनगर,लोंढा,गुंजी आदी बसेस वेळेत धावत नाहीत.त्यामुळे खेड्याच्या विद्यार्थ्याना खानापूरला जाऊन पोहचायला उशीर होतो.त्यामुळे त्याचा पहिला तास चुकतो.व शैक्षणिक नुकसान होते. हे नित्याचेच आहे.
असे मंगळवारी दि २९ रोजी खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी हे तालुक्याच्या दौर्यावर गेले असता पणजी बेळगाव महामार्गावरील शिंदोळी क्राॅसवर शालेय विद्यार्थ्यानी सांगीतले.
लागलीच खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यानी खानापूर डेपो मॅनेजरशी संपर्क साधुन रामनंगर,लोंढा,गुंजी बसेस शाळेच्या वेळेत सोडुन क्राॅसवर थांबलेल्या विद्यार्थ्याना वेळेत घेऊन जाण्याची सुचना केली.
यापुढे असा प्रकार घडला. रास्ता रोकोचा ईशारा दिला आहे.
यावेळी खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी,खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर,राजू पाटील,ईश्वर बोबाटे,आदी काॅग्रेसचे नेते उपस्थित होते.
यावेळी डेपो मॅनेजरनी समस्या जानून घेतली.व समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.