
#सागरे ,नजिलकोडल ,कुनकिकोप,वडेबैल,बेकवाड, भागात हत्तीकडुन पिकांचे नुकसान!
#खैरवाड,हडलगा,चापगाव भागात बीबट्याचा वावर!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर तालुका हा अतिजंगलाचा तालुका म्हणुन ओळखला जातो.त्यामुळे खानापूर तालुक्याला जंगली प्राण्याकडुन पिकाचे प्रचंड नुकसान सातत्याने होत असते.
सध्या सुगीचे दिवस सुरू झाले आहेत.भात पिके शेतकर्याच्या हातातोंडाशी आलेली आहेत.ऊस पिकेही आहेत.
असे असताना नुकताच हत्तरवाड जंगलातुन सागरे,कुनकीकोप,नजिलकोडल ,दोडेबैल,बेकवाड परिसरातील शिवारात हत्तीचे अगमन होऊन उस पिकाबरोबर भात पिकाचेही हत्तीकडुन नकसान झाले.
सध्या हातातोंडाशी आलेली भातपिक अचानक पडलेल्या पावसाने जमिन सपाट झाले आहे.त्यातच आता कुणकीकोप ,नंजीलकोडल ,सागरे भागात हत्ती आल्याने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले.
एकीकडे पावसामुळे पिकाचे नुकसान झाले असताना आता हत्तीच्या अगमनाने भात व उस पिकाचे आता प्रचंड नुकसान झाल्याने बळीराजा हैराण झाला आहे.
वनखात्याने,लोकप्रतिनिधीनी हत्तीच्या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे!
खानापूर तालुक्यात हत्तीचे अगमन काही नवीन नाही. मात्र ऐन सुगीच्या दिवसात हत्ती आला म्हणजे पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होणार . तेव्हा वनखात्याने तसेच लोकप्रतिनिधीनी हत्तीला पिटाळुन लावण्यासाठी योग्यती कारवाई करावी .अन्यथा शेतकर्याच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे हत्तीकडुन मोठ्याप्रमाणात नुकसान होणार याची काळजी शेतकरी वर्गाला आहे.
आता बिबट्याचा वावर
खानापूर तालुक्यातील खैरवाड,हडलगा भागात बिबट्यचा वावर वाढला असुन ऐन सुगीच्या काळात हडलगा येथील शेतकर्याच्या बकर्याचा फडला असुन परिसरातील अनेक कुत्री बिबट्याच्या भक्षस्थानी पडली आहेत.
त्यामुळे हत्ती बरोबरच बिबट्याचा ही धोक्का शेतकरी वर्गाला होत आहे.
याकडे वनखात्याच्या अधिकारी तसेच लोकप्रतिनिधीनी जातीने लक्ष देऊण वनप्राण्याचा शेतकरीवर्गाला होणारा त्रास दुर करावा.तसेच वनखात्याकडुन शेतकर्याना नुकसान भरपाई वेळेत मिळावी. अन्यथा शेतकरीवर्गाला अन्याय होईल. अशी चर्चा खानापूर तालुक्यातील जनतेतुन होताना दिसत आहे.