
#खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी याच्याहस्ते शुभांरभ!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
खानापूर शहराजवळील हलकर्णी ग्राम पंचायत हद्दीतील गणेशनगर काॅलणीत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला.
हलकर्णी ग्राम पंचायत हद्दीतील कोर्टजवळील गणेशनगरात गेल्या अनेक वर्षापासुन गटारी ,रस्त्याची समस्या होती.
यासाठी खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यांच्या प्रयत्नाने गणेशनगर काॅलनीत रस्ता ,गटारी कामाना मंजुर मिळाली.
लागलीच रस्त्याच्या कामाचा शुंभारंभ करण्यात आला. यावेळी खानापूर तालुका क्राॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यांच्याहस्ते पुजन करून कामाची सुरूवात करण्यात आली.
गणेशनगरात गेल्या कित्येक वर्षापासुन रस्त्याचे काम न झाल्याने रहिवाशातुन नाराजी पसरली होती. पण खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यानी पुढाकार घेऊन रस्त्याच्या कामासाठी प्रयत्न केले.त्यामुळे गणेशनगर काॅलनीतील रहिवाशातुन समाधान पसरले आहे.
गणेशनगर काॅलनीतील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करताना खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी तसेच गणेशनगरातील रहिवाशी खानापूर तालुका डाॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ. डी .ई.नाडगौडा , महाराष्ट्र बॅकेचे गणपत मोटेकर,,संजु चौगुले,प्रमोद देसाई ,विनायक मुतगेकर , श्री शास्त्री,श्री नदाफ,आदी उपस्थित होते.