
#मुहूर्तमेढ रोवण्याचा कार्यक्रम संपन्न!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
कौलापूरवाडा ( ता. खानापूर ) येथे सालाबाद प्रमाणे यंदाही कार्तिकी वारी निमित्त मंगळवार दि १२ रोजी दीड दिवसाचा पारायण सोहळा आयोजित केला आहे .
या निमित्त पारायण सोहळ्याची मुहुर्त मेढ बुधवार दि. ६ रोजी रोवण्यात आली.
यावेळी मुहूर्त मेढ सोहळ्याला मारुती पाटील महाराज किणेय,मजुकर महाराज मछे,वाघु धो.पाटील,गंगाराम बावदाने,नामदेव पाटील,धुळु जंगले,धावु पाटील वाघु धा.पाटील ,बाबु पाटील, साजु पाटील,राघु येडगे,चींगळु बावदाने,भैरु पाटील,बमु शींदे, भजनी मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत आम आदमी पक्षाचे खानापूर तालुका अध्यक्ष भैरू पाटील यानी केले.
यावेळी बोलताना खानापूर तालुका आम आदमी अध्यक्ष भैरू पाटील म्हणाले की सालाबाद प्रमाणे यंदा ही दीड दिवसाचा पारायण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. तेव्हा भाविकानी या दीड दिवसाच्या पारायण सोहळ्याचा लाभ घ्यावा.असे आवाहन करण्यात आले.