
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष अँड. ईश्वर घाडी यांच्याकडून आव्हान करण्यात येत आहे की उद्या रविवार दि.७ रोजी सकाळी ११ वाजता ” चौगुले पाटील ऍग्रो इंडस्ट्रीज गुळाचा कारखाना या कारखान्याचे उद्घाटन होणार असून त्या कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यांच्या हस्ते कारखान्याचे दीप प्रज्वलन होणार आहे .
तेव्हा ज्या काँग्रेस कार्यकर्त्यांना कार्यक्रमाला उपस्थित राहायचं असेल त्याने सकाळी दहाला असोगा भोसगळीरोड येथे उपस्थित रहावे।
त्याच्यानंतर भोसगाळी येथे काॅग्रेसच्यावतीने कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. व त्याच्या नंतर जांबोटी येथे साडेबारा वाजता व नंतर चिगुळे, कणकुंबी व ओलमनी येथे कार्यकर्त्यांच्या भेटगाठी घेऊन काँग्रेस पक्ष वाढीसाठी चर्चा करण्यात येणार आहे त्यानिमित्त ज्या कार्यकर्त्यांनी यायचं असेल त्यांनी खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अध्यक्ष अँड. ईश्वर घाडी यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन अँड. घाडी यानी केले आहे.