
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर तालुक्यातील अक्राळी क्राॅसजवळील गोवा महामार्गावर थांबलेल्या ट्रकला एँक्टिव्हा दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला. तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी रात्री घडली.सदर घटनेची नोंद लोंढा पोलिसस्थानकांत झाली आहे
याबाबत मिळालेली माहिती अशी की ,मुळचे तीनईघाट (ता.जोयडा) येथील दुचाकी स्वार एँथोनी डिलीमा ( वय.३५) व त्याची पत्नी जास्मिन डिलीमा (वय.३२)
हे गुरूवारी रात्री ७.३० वाजता रामनगर येथील आपली बेकरी बंद करून दुचाकीवरून तीनईघाट येथे आपल्या घरी जात होते. गोवामार्गावरील अक्राळी क्राॅसजवळील कृष्णा हाॅटेल जवळ थांबलेल्या ट्रकला मागुन दुचाकीची जोराची धडक बसली. त्यात दुचाकी स्वारच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.तसेच पत्नी ही गंभीर जखमी झाली.लागलीच स्थानिकानी उपचारासाठी रामनगर सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.प्राथमिक उपचार करून बेळगांवला पाठविण्यात आले.मात्र दुचाकीस्वाराचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेची नोंद लोंढा पोलिस स्थानकात झाली आहे.
पत्नी वर उपचार सुरू आहेत.
या घटनेने तीनईघाट परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.