
#तालुक्यातील ४३ तलठ्यांचासहभाग !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील)
खानापूर तालुक्यातील ५१ ग्राम पंचायतीच्या हद्दीतील ४३ तलाठ्यानी आपल्या विविध मागण्यासाठी चौथ्या दिवशी ही खानापूर तहसील कार्यालयाच्या आवारात आंदोलन सुरूच आहे.
यावेळी तलाठ्यानी विविध मागण्या सरकारापुढे मांडल्या आहेत.
तलाठ्याच्या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील नागरीकाना आंदोलनास्थळी भेट घेण्याची वेळ आली.
तलाठ्यांनी लेखणी बंद व आँनलाईन कामे ही बंद अस पवित्रा घेतल्याने नागरीकाच्या शेती उत्तार्यासह,जात ,उत्पन्न दाखल्यास अनेक कागद पत्रे मिळण्यास आडचणी होत आहेत.
यावेळी खानापूर तालुक्यातील विविध संघटनानी तलाठ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यात येत आहे.
यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड याना तलाठ्यांच्यावतीने आपल्या विविध मागण्याचे निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की सरकारने आमच्या मागण्याची दखल घेई पर्यत आंदोलन सुरू ठेवणार आहे . असा निर्णय घेण्यात आला.असे सागितले.
यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी निवेदनाचा स्विकार करून सरकार दरबारी पाठविण्याचे आश्वासन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष शंकर माळगी, आर .एस.बागवान,श्री मंजुनाथ, गणेश शट्टी, तसेच तलाठी गजानन देसाई,श्री सायबण्णावर, श्री बुरूड आदी ४३ तलाठी उपस्थित होते.