
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील मलप्रभा नदीवरील पुलावरील बंधार्यावर पाणी आडविण्यासाठी अर्धवट फळ्या पाटबंधारे खात्याने घातल्याने नदी पात्रातील पाणी एका बाजूने वाया जात असल्याने मलप्रभा नदीच्या पात्रातील पाण्या पातळीत घट होत आहे.
याची दख्खल खानापूर नगरपंचायतीच्या अधिकार्यानी व नगरसेवकानी घेतली. आणि प्रत्यक्ष बंधार्याला भेट देऊन नदी पात्रातील पाण्याची पाहणी केली.
यावेळी पाटबंधारा खात्याचे अधिकारी रामकृष्ण मराठे याना संपर्क करून नदी पात्रातील पाण्याची परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यांची कान उघडणी केली.
लवकरात लवकर नदीपात्रातील पाणी वाहुन जात असलेल्या ठिकाणी फळ्या घालुन वाया जाणारे पाणी थांबवावे.
अन्यथा जिल्हा अधिकार्याच्याकडे रितसर तक्रार करून कारवाईचा ईशारा दिला. ऐवढेच नव्हे तर मलप्रभानदी पात्रातील पाण्याचा साठा कमी झाला तर पाटबंधारा खात्याचे अधिकारी याला जबाबदार असणार असा ईशारा नगरपंचायतीच्या अधिकार्यानी व नगरसेवकानी दिला.
यावेळी नगरपंचायतीचे इंजनिअर तिरूपती राठोड ,नगरसेवक व माजी माजी स्टॅडींग कमिटीचे अध्यक्ष प्रकाश बैलूरकर, आप्पया कोडोळी,रफिक वारेमणी,नगरपंचायतीचो कर्मचारी श्री अल्ताप व इतर उपस्थित होते.