
#मतदान होऊन आठ दिवस झाले.!
#दोन पॅनलची चुरस !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील खानापूर को.आँप.बॅकेची निवडणुक होऊन आठवडा झाला. तर बॅकेच्या निवडणुकीचा निकाल आजुन लागला नाही. त्यामुळे तालुक्यातील सभासदासह मतदारातुन व जनतेतुन मोठी उत्सुकता लागुन आहे.
खानापूर को.आप. बॅकेची पंचवार्षिक निवडणुक रविवारी दि.१२ रोजी मोठ्या चुरशीने ७४ टक्के मतदान झाले. या बॅकेच्या निवडणुकीत विद्यमान संचालकानी सहकार पॅनल व विकास पॅन यांच्यात चुरशी लढत झाली.दोन अपक्ष उमेदवार ही लढले.
मात्र या निवडणुकचा निकाल कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.
सहकार पॅनल व विकास पॅनल दोन्ही ही पँनलनी उच्च न्यायालयात धाव घेऊन मतदाना दिवशीच ९४५ मतदान वाढवुन आणले होते.मतदानाच्या आकड्यात वाढ होऊन सुरूवातीच्या १९२१ मतदानात ९४५ मतदानाची वाढ होऊन २८६६ इतके मतदार त्यापैकी २१३१ मतदान होऊन ७४ टक्के इतके मतदान झाले.
परंतु मतदार खंडपिठाकडे याचिका दाखल करण्याचे लक्षात घेऊण नियोजित मतमोजणी स्थगित करण्यात आली अद्याप कुणाचा मतदार वाढीला अक्षेप नसल्याने निकालाचा मार्ग मोकळा आहे.
आज सोमवारी ( ता २० ) रोजी यासंदर्भातील सुनावनी शक्य आहे. तेव्हा येत्या दोन दिवसात खानापूर को.आँप.बॅकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.