
#आज जनसेवा पुरस्काराने होणार सन्मान!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
फुलेवाडी (डुक्करवाडी) (ता.खानापूर) गावचे सुपूत्र कुंभारकलाकार पुंडलिक एम.कुंभार यांच्या ” मार्डन पाॅटरी अँड टेराकोटा आर्टस” मधील त्याच्या अतुलनिय कामगीरीबद्दल त्याच्या शारीरिक आव्हाने असुन ही त्याच्या कठोर परिश्रम ,दृढनिश्चय आचिकाटी दिसुन येते.
त्याच्या या कार्याचे कौतुक म्हणून लोकप्रिया जनसेवा संस्थेचा फिजिकली चॅलेंज पुरस्कार सोहळा २०२५ प्रदान करण्यात येत आहे.
आज रविवारी दि.२३ रोजी दुपारी ४.३० वाजता शहापूर येथील सरस्वती रोड, नाथ पै सर्कल जवळील लोकप्रिया जनसेवा संस्था येथे होणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे.
तर अतिथी म्हणून सौ ज्योत्स्ना पै. व्यवस्थापकीय संचालक पै बेकरी, डाॅ.सुरेश कुलकर्णी अध्यक्ष इंडियन रेड क्राॅस सोसायटी, युवराज कदम माजी चेअरमन बुडा,आणि एपीएमसी बेळगाव.
आमचे प्रेरणास्थान माजी आमदार व शिक्षणतज्ञ गुरूवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी,तसेच प्रसिडेंट गजानन साबन्नावर ,व्हा.प्रसिडेट प्रशांत एन .हुंदरे, आदी उपस्थित राहणार आहेत.