
#कुटूंबाची घेतली भेट!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
चिगुळे ( ता.खानापूर ) येथील शेतकरी विलास चिखलकर (वय.५५) याच्यावर शेतातील झोपडीत रविवारी अस्वलाने भयानक हल्ला करून गंभीर जखमी केले.
त्यांना उपचारासाठी के एल ई हाॅस्पिटलमध्ये दाखल केल्याचे समजताच खानापूर तालुका ब्लाॅक अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यानी केएलई हाॅस्पीटलमध्ये जाऊन चिखलकर कुटूंबाची भेट घेतली.
तसेच माजी आमदार व एआयसीसी सचिव डाॅ.अंजली निबाळकर यानी खानापूर एसीएफ यांच्याशी संपर्क साधुन सरकारी मदत करण्यासंदर्भात सुचना केल्या. लागलीच एसीफ यानी मदती संदर्भात सरकारकडे आँन लाईन अर्ज केल्याचे सांगीतले.
यावेळी खानापूर तालुका ब्लाॅक काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी व माजी जि.प.सदस्य पांडुरंग देसाई चिखलकरांच्या कुटूंबाशी चर्चा करून अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विलास चिखलकर यांना काॅग्रेस सरकारकडुन जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यास माजी आमदार अंजली निबाळकर या प्रयत्नशी राहणार आहेत. असा विश्वास बोलताना त्यानी दिला.
मागील महिन्यात मान (ता. खानापूर ) येथील शेतकरी अस्वलाच्या हल्ल्यात एक पाय निकामी झाला होता.त्याला मोठी मदत करण्यात आली. त्याच प्रमाणे या ही शेतकर्याला मदत करण्यात येणार असल्याचे त्यानी सांगीतले.