
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी.
खानापूर शहराच्या विकास कामासाठी तसेच सुविधासाठी नगरपंचायतीला ५ कोटी निधी द्यावा. असे निवेदन बेळगांव जिल्हा पालक मंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांची त्यांच्या निवासस्थानी शनिवारी दि.२२ रोजी खानापूर नंगरपंचायतीच्या नगरसेवकानी भेट घेऊन निवेदन दिले़.
यावेळी पालकमंत्री सतीश जारकी़होळी यांनी निवेदनाचा स्वीकार करून निश्चितपणे निधीची कार्यवाही करू असे आश्वासन दिले.
यानिमित्त पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना कर्नाटक राज्य मुक्तविद्यापीठातर्फे मानद डाॅक्टरेट पदवी जाहीर केल्याबद्दल त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी खानापूर नगरपंचायतीचे माजी स्थायी कमिटी चेअरमन व विद्यमान नगरसेवक प्रकाश बैलूरकर माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक मजहर खानापूरी,नगरसेवक आपय्या कोडोळी, नगरसेवक रफिक वारेमनी आदी उपस्थित होते.
photo