
#नागुर्डावाडा मराठी शाळा मुख्याध्यापिका!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
नागुर्डावाडा ( ता.खानापूर ) येथील पूर्व प्राथमिक मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ए डी चोपडे याना आंतरराष्ट्रीय महिला दिन सन २०२४-२५ सालाचा रानी चन्नमा सेवा रत्न पुरस्कार गुरूवार दि.२७ रोजी बेळगाव येथील कुमार गंधर्व हाॅल येथील समारंभात देऊन गौरविण्यात आला.
श्रीमती ए डी चोपडे यानी शिक्षकी सेवेला सन १९९५ साली नागुर्डा (ता.खानापूर ) येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेतुन सुरूवात केली. याशाळेत त्यानी २० वर्षे सेवा बजावली.त्यानंतर त्याची बदली सन २०१५ साली जवळच असलेल्या नागुर्डा वाडा(ता.खानापूर ) येथील पूर्व प्राथमिक मराठी शाळेत झाली.
याच शाळेत आज तागायत शिक्षकी सेवा करत आहे.
मुख्याधिपिका म्हणून सेवा बजावत असताना त्याना क्रिडा क्षेत्रात यश संपादन केले. यंदा सरकारी नोकरवर्गाच्या जिल्हा क्रिडास्पर्धेत लांब उडीत प्रथम क्रमांक पटकावुन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.यापूर्वी सुध्दा धावण्याच्या स्पर्धेत यश संपादन केले आहे. कार्याची नोंद घेऊन त्याना निवृत्तीच्या उंबरड्यावर असतानाच आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राणी चन्नमा सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ, जिल्हा प्रधान कार्यदर्शी रमेश गोणी, जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष जयकुमार हेब्बळी ,शहर बीईओ श्री बजंत्री ,रामदुर्ग बीईओ श्री बलिगार व इतर पदाधिकार्याच्या उपस्थितीत सत्कार मुर्ती मुख्याध्यापिका श्रीमती ए.डी.चोपडे यांचा फेटा,शाल ,हार घालुन सत्कार करण्यात आला.यावेळी खानापूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.