
#खानापूर वकील संघटनेचे अध्यक्षअँड. आय.आर घाडीनी मांडल्या मागण्या !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष एड. ईश्वर घाडी यांनी कर्नाटक स्टेट बार कौन्सिलचे अध्यक्ष एस.एस.मित्तलकोड तसेच प्रदान कार्यदर्शी के.एन.सुनीता यांची बेंगलोर येथे भेट घेऊन वकिलांच्या कल्याणासाठी विविध मागण्या केल्या. त्यामध्ये प्रामुख्याने टॅक्स केसीस, मोटर व्हेईकल रिलीज केसेस , ज्युनिअर वकिलांना मासिक वेतन तसेच सर्व बँकांच्या केसीस न्यायालया कडे वर्ग करणे आदी सह अन्य मागण्याचा समावेश आहे.
यावेळी एड. ईश्वर घाडी म्हणाले प्रत्येक जिल्ह्याला भारतीय न्याय सविता (बि.एन.एस) कायद्या संदर्भात कार्यशाळा भरवून त्या संदर्भात माहिती देण्याचे सांगितले.
खानापूर तालुक्या मध्ये सध्या वाढलेली लोकसंख्या व सध्या असलेल्या नोटरींची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतपत आहे. खानापूर तालुक्यात कमीत कमी दहा नोटरी असणे गरजेचे आहे. यामध्ये महिला नोटरींचा समावेश करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.दिवसेंदिवस वकिलांची वाढती संख्या पाहता त्यांना केसेस मिळणे गरजेचे आहे. तसेच जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्याकडे प्रलंबित असलेले आरपीएस मॅटर कोर्टाला वर्ग करण्याची त्यांनी विनंती केली.
यावेळी स्टेट बार कौन्सिलचे अध्यक्ष एस.एस.मित्तलकोड यांनी निवेदनाचा गांभीर्याने विचार करून भविष्य काळामध्ये वकिलांच्या कल्याणासाठी व त्यांच्या वारसदारांना मिळणाऱ्या मानधनां मध्ये वाढ करण्याचे आश्वासन दिले.