
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
कर्नाटक राज्य गुप्तचर विभागाचे संचालक व वरिष्ठ आय.पी.एस. अधिकारी हेमंत निंबाळकर यांना नुकताच मुख्यमंत्री पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
कर्नाटक राज्यात अनेक वरिष्ठ अधिकार्याना मुख्यमंत्री पदाकासाठी निवड घोषित करण्यात आली होती.
त्यानुसार नुकताच झालेल्या कार्यक्रमात राज्य गुप्तचर विभागाचे संचालक आणि वरिष्ठ आय.पी.एस. अधिकारी याना हे पदक मुख्यमंत्री सिध्दरामया यांच्याहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले .
नक्षलवादी चळवळीच्या समूळ उच्चाटनासाठी राज्य गुप्तचर विभागाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन गुप्तचर विभागाचे प्रमुख संचालक आणि वरिष्ठ आय पी एस अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्यासह गुप्तचर विभागातील २२ अधिकारी व कर्मचारी आदीना मुख्यमंत्री पदकाने सन्मानित करण्यात आले.
कर्नाटक राज्य गुप्तचर विभाग व नक्षलविरोधी दलाच्या अधिकारी व कर्मचार्यानी राज्यातील व शेजारी राज्यातील नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यानी या विशेष मोहिमे मध्ये भाग घेऊन राज्य नक्षलमुक्त केले आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्या अधिकार्यांची २०२४ साला साठी दिल्या जाणार्या मुख्यमंत्री पदकासाठी निवड करण्यात आली आहे.