
बीईओ कार्यालयाच्यावतीने सपत्नीक सत्कार!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर ( सुहास पाटील)
खानापूर तालुका बीईओ कार्यालयाचे एफ डी सी राजाराम गणपत चिगुळकर हे ३६ वर्षाच्या सेवेतुन प्रथम दर्जा सहाय्यक म्हणून शुक्रवारी दि.३१ रोजी सेवानिवृत्त झाले.
त्यानिमित्त त्याचा सपत्निक सत्कार पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीईओ राजश्री कुडची होत्या.
तर व्यासपिठावर सत्कारमुर्ती राजाराम चिगुळकर व त्यांच्या पत्नी तसेच समन्वय अधिकारी ए.आर.आंबगी, बीईओ आँफिसचे मॅनेजर प्रकाश होसमनी ,नोकर संघाचे तालुका अध्यक्ष बी.एम.यळ्ळूर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात दीप्रज्वलनाने झाली.
यावेळी सत्कारमुर्ती राजाराम चिगुळकर यांचा सपत्निक सत्कार बीईओ कार्यालयाच्यावतीने शाल , पुष्पहार व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
त्याच बरोबर शिक्षक संघटना, तालुका नोकर संघटना तसेच विविध शाळा मुख्याध्यापक व शिक्षकांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बीईओ राजश्री कुडची, तालुका नोकर संघाचे अध्यक्ष बी.एम.यळ्ळूर व इतराची भाषणे झाली.
यावेळी सत्कारमुर्ती राजाराम चिगुळकर बोलताना म्हणाले की , माझ्या नोकरीची सुरूवात खानापूर बीईओ ऑफिस मध्ये सन १९८८ साली झाली . त्या नंतर सरकारी सरदार हायस्कूल बेळगाव,ज्याईंट डायरेक्टर ऑफिस बेळगाव, कमिशनर ऑफिस धारवाड,व पुन्हा बीईओ ऑफिस खानापूर मधून दि.३१ ऑगस्ट २०२४ रोजी ३६ वर्षाच्या सेवेतून प्रथम दर्जा सहाय्यक म्हणून निवृत्त.
गेल्या ३६ वर्षात नोकरीमध्ये अनेक अनुभव आले.शेवटी खानापूर बीईओ कार्यालयातुन सेवानिवृत झालो.
असे मत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाला खानापूर तालुका प्राथमिक शाळा शिक्षक संघटनचे अध्यक्ष आय बी सनदी, कार्यदर्शी पिराजी पाखरे, व संचालक ,शिक्षक सोसायटीचे अध्यक्ष वाय एम पाटील,व संचालक ,विविध शाळाचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच बीईओ कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.