
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
बिडी ( ता. खानापूर ) येथील वृध्द दांपत्याला सायबेर गुन्हेगारांनी व्हिडीओ काॅलवरून नग्न फोटो असल्याचे सांगुन पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याने वृध्द दांपत्याने आत्महत्या केल्याची घटना नुकताच घडली.
याबाबतची माहिती अशी की,बिडी ( ता .खानापूर ) येथील ख्रिचन गल्लीतील डायगो संतान नाझरेथ (वय.८३) व पत्नी फ्लेविया डायगो नाझरेथ ( वय. ७९) हे दोघे ही मृतावस्थेत आढळले.
लागलीच शेजार्यानी नंदगड पोलिसाना याबाबतची माहिती दिली.नंदगड पोलिसानी घटनास्थळी धाव घेऊन तपास केला असता . पोलिसांच्या हाती इंग्रजीत लिहिलेली एक सुसाईड केलेली चिटी सापडली.की ज्यामध्ये डायगो नाझरेथ लिहिले की ,त्याना जानेवारी पासुन दिल्लीतील बीएसएनएलचा उच्चपदस्थ अधिकारी असल्याचा दावा कणार्या एका व्यक्तीने धमकी दिली होती. व पैशाची मागणी करत डायगोला सीमकार्डाचा गैरवापर केल्याबद्दल त्याला डिजीटलली अटक केली जात आहे. अशा प्रकारची धमकी देण्यात आली. व वरचेवर पैशाची मागणी करत जवळपास ५ ते ६ लाख रूपये संबधितानी लाटल्याचे समजते.
त्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळुन दोघा पती पत्नीनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. पत्नीने विष घेऊन तर डायगोने आपल्या गळ्यावर चाकूने वार करून घेतला . व जीव जात नसल्याचे पाहुण पाण्याच्या टाकीत उडी टाकुन आत्महत्या केली.
मृतदेह शवविच्छेदनासाठी बिम्स रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.