
बसमधील पायातील प्लाऊड मोडल्याने बसमधुन महिला गेली बसखाली!
# स्पीडब्रेकरमुळे बस सावकाश गेल्याने महिलेचे जीव बचावला!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर आगाराची खानापूर गोदगेरी (केए २२ एफ .१९७२ ) बस खानापूर हुन गोदगेरीला जाताना खानापूर शहरापासुन काहीअंतरावर असलेल्या रूमेवाडी क्राॅसवरील स्पीडब्रेकवर बस आली असता बसमधील प्लाऊड मारलेल्या भागात महिला उभी होती.स्पीडब्रेकर वरून जाताना बसमधील पायातील प्लाऊड मोडून महिला बसखाली गेली स्पीडब्रेकरवर असल्याने बसचा स्पीड कमी होता.शिवाय बसच्या चाकाच्या मागील बाजचा प्लाॅऊड मोडला. त्यामुळे चाकाच्या धोक्याचा काहीपरीणाम झाला नाही. मात्र महिला गंभीर जखमी झाली.लागलीच उपचारासाठी सरकारी दवाखाण्यात पाठविण्यात आले.
सदर महिलेचे नाव पद्मिनी भुजंग कदम ( वय ६०) रा.निडगल (ता.खानापूर ) असे आहे.
बस मधील विचित्र आपघात पाहुन बसपरिवहन मंडळाच्या कारभाराबद्दल प्रवाशातुन तसेच नागरीकातुन तीव्र नाराजी पसरली आहे.
तर खानापूर डेपो मधील बस वाहनाची आवस्था पाहुन नागरीकांतुन एकच चर्चा सुरू होती .
तेव्हा खानापूर डेपोला नवीन बसेस देण्याची मागणी खानापूर तालुक्यातील जनतेतुन होत आहे.
या विचित्र आपघातातुन महिला बचावली हे तिचे मोठे भाग्य म्हणावे लागेल.